News

INDvWI, पहिला कसोटी सामना- घरच्या खेळपट्टीवरील नव्या युगाला दणदणीत विजयाने सुरूवात

By Mumbai Indians

तुम्ही वर्चस्व म्हणाल तर आम्हाला टीम इंडियाचे नवीन युग ऐकू येते! 🔥

शुभमन गिल आणि कंपनीने संपूर्ण अष्टपैलू कामगिरीत वेस्ट इंडिजला धुवून टाकले आणि मालिकेच्या पहिल्याच सामन्यात विजयाची नोंद केली.

फलंदाजांनी मधल्या फळीत धमाल केली तर गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स घेऊन प्रतिस्पर्धी संघाला जराही मैदानात टिकू दिले नाही.

अहमदाबादमध्ये सामना कसा पार पडला ते पाहूया.

दिवस १ | भारताने वर्चस्व कायम राखले

प्रथम क्षेत्ररण करताना यजमान संघाने विंडीजच्या फलंदाजांना हलवून टाकले आणि त्यांच्या अर्ध्या टीमला पहिल्याच सत्रात बाद केले.

जेवणानंतरचे सत्र ९०/५ वर सुरू झाले. पाहुणा संघ पत्त्यांच्या डावाप्रमाणे कोसळत राहिला आणि त्यांची इनिंग १६२ वर संपली.

बुमराह आणि सिराजच्या जोडीने हल्ल्याचे नेतृत्व करून अनुक्रमे तीन आणि चार विकेट्स नावावर नोंदवल्या. 🤝

टीम इंडियाच्या फलंदाजांनी वेग आपल्या बाजूने फिरवत ठेवला तर केएल राहुल स्टंप्सवर ५३ धावांवर नाबाद राहिला. त्याने दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी धावांमधील अंतर कमी केले.

📝 स्टंप्स दिवस पहिला: 🇮🇳 - १२१/(३८ ओव्हर्स) ४१ धावांची पिछाडी

दिवस दुसरा | केएल, जुरेल, जडेजा यांची ट्रिपल ट्रीट

दुसऱ्या दिवशी पिच फलंदाजीसाठी मोकळे झाले आणि आपल्या फलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला.

केएल जुरेल जडेजा या तिघांनी आपली वैयक्तिक शतके पूर्ण केली आणि विंडीजच्या गोलंदाजांना दिवसभर पळवत ठेवले.

निकाल? दिवसाअखेरीस अप्रतिम आघाडी. आपल्या तंबूतल्या आनंदी चेहऱ्यांनी विजय नक्की आहे याची चाहूल दिली. 🤞

📝 स्टंप्स, दिवस दुसरा: 🇮🇳 - ४४८-(१२८ ओव्हर्स) २८६ धावांचे नेतृत्व.

दिवस तिसरा | आश्चर्यकारक घोषणा आणि अटळ घटना

अर्थात, असे काही घडेल असे कोणालाच वाटले नव्हते. <आम्ही विजयी झाल्याबद्दल बोलत नाही आहोत>

भारतीय क्रिकेट टीमने दिवसाच्या सुरूवातीला २८६ धावांची आघाडी ठेवून आपल्या इनिंगची घोषणा केली.

आपल्या गोलंदाजांनी दुपारच्या जेवणापूर्वी अर्ध्या विंडीज टीमला घरचा रस्ता दाखवला. त्यांनी मैदानावर हटके कामगिरी केली. ⚡

पाहुण्या संघाने १४६ धावसंख्या असताना मैदानाचा निरोप घेतला आणि भारताला दोन सामन्यांच्या मालिकेत १-० आघाडी दिली. मोहम्मद सिराजने घरच्या खेळपट्टीवर सर्वोत्तम कामगिरी केली (/५७) आणि इंग्लंडविरूद्ध राजकोटवर केलेल्या ४/१०० या कामगिरीला मागे टाकले.

**********

थोडक्यात धावसंख्या: वेस्ट इंडिज १६२/१० (जस्टिन ग्रीव्हस ३२, मो. सिराज ४/४०) आणि १४६/१० (एलिक अथनाझे ३८, रवींद्र जडेजा ४/५४) चा भारताकडून एक इनिंग आणि १४० धावांनी पराभव ४४८/५ दिवस (ध्रुव जुरेल १२५, रोस्टेन चेस २/९०).