
२०१५,२०१९ आणि २०२२ मध्ये #OnThisDay – रोस्कायचे ऐतिहासिक दिवस
काही दिवस इतिहासात नोंद करण्यासाठीच बनलेले असतात आणि आपल्या पोरांचा विषय येतो तेव्हा ते आपलं नाव ब्लू अँड गोल्डमध्ये कोरलं जाईल याची काळजी घेतात! 💥
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी #OnThisDay दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन वेगवेगळ्या ठिकाणी सर्व स्वरूपांमध्ये मास्टरक्लास दिला होता. आपल्या अंगावर अजूनही काटा आणणाऱ्या त्या सर्व खेळांची उजळणी करूया!
२०१५ | धर्मशाळा | हिटमॅनचे पहिले टी२०आय शतक
रो फक्त फलंदाजी करत नाही तर तो बॅटने संपूर्ण मैदान घुमवतो!
रोहित शर्माने २०१५ मध्ये धर्मशाळामध्ये आपले पहिलेच टी२०आय शतक (६६ चेंडूंमध्ये १०६ धावा) पूर्ण केले. थोडक्यात सांगायचे तर तो “मुंह पे देगा तो देता हूँ ना” ची तयारीच करत होता. 😉
या सामन्यात भारताचा विजय झाला नाही परंतु रोहितची इनिंग अविस्मरणीय झाली.
२०१९| वैजग | पहिल्याच कसोटीत सलामी फलंदाज म्हणून द्विशतक
पहिल्या वेळी इतकी मजा आली की रोला हे दोनदा करावे लागले! 😌
रोहित २०१९ मध्ये करियरमध्ये पहिल्याच वेळी कसोटी सलामी फलंदाज म्हणून खेळायला गेला आणि त्याने त्यावर अक्षरशः राज्य केले. त्याने पहिल्या इनिंगमध्ये १७६ धावा तर दुसऱ्या इनिंगमध्ये १२७ धावा केल्या. त्यामुळे प्रोटीआजचे गोलंदाज अक्षरशः गोंधळले होते.
The only Indian opener to score a 💯 in:
— Mumbai Indians (@mipaltan) October 2, 2019
ODIs ✅
T20Is ✅
And now,
Tests ✅
Take a bow, @ImRo45 💙#OneFamily #CricketMeriJaan #INDvSA @BCCI pic.twitter.com/82pRhUqre2
त्याने वर्चस्व गाजवले आणि लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुढील वर्षांमध्ये ओपनिंगची जागाय कायम केली. त्याच्या या सुंदर खेळामुळे टीम इंडियाला २०३ धावांच्या मार्जिनने विजय मिळवता आला. ✔️
२०२२ | गुवाहाटी | सूर्यादादाचा राडा
मग आला सूर्यकुमार यादव.
गुवाहाटीमध्ये स्काय दक्षिण आफ्रिकेविरूद्ध उत्तम खेळला. त्याने फक्त २२ चेंडूंमध्ये ६१ धावा करून स्टेडियमला वैयक्तिक लाँचपॅडमध्ये रूपांतरित केले. त्याने पाच चौकार आणि पाच षट्कारांनी आपली खेळी सजवली.
सूर्या दादा at his best! 🫶🔥#OneFamily #INDvSApic.twitter.com/sRNb5tguKP
— Mumbai Indians (@mipaltan) October 2, 2022
आपल्या या तोडफोडीमुळे त्याने टी२०आय मध्ये १०००* धावा पूर्ण केल्या आणि या सामन्यात १६ धावांनी विजय मिळवायला मदत केली. 🔥
**********
पलटन, तुम्हाल जास्त मजा कुठे आली? कमेंट बॉक्स खुला आहे! 💭