News

हार्दिक: कमबॅकचा धडाका | शार्दुल: नवीन चेंडूने धुमाकूळ

By Mumbai Indians

पलटन, आजचा दिवस खूप खास होता. एचपीचा देखणा कमबॅक ते शार्दुलची धडाकेबाज गोलंदाजी यांच्यामुळे स्मॅट २०२५ मध्ये सर्वच चाहते अचंबित झाले होते. चला तर पाहूया.

हार्दिकचा स्टायलिश कमबॅक

दुखापतीतून बाहेर आलेल्या हार्दिक पांड्याने फक्त पुनरागमनच केले नाही तर स्टाइलमध्ये स्वतःच्या आगमनाची वर्दी दिली.

परतल्यानंतर आपल्या पहिल्या स्पर्धात्मक सामन्यात त्याने ७ चौकार आणि ४ षट्कारांच्या मदतीने ४२ चेंडूंमध्ये ७७ धावा फटकावल्या. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने पंजाबविरूद्ध बडोद्याच्या २२४ धावांच्या पाठलागाला एक ऊर्जा दिली. 

त्याचा प्रत्येक शॉट बघून सगळे जागच्या जागी उड्या मारत होते आणि इनिंगच्या शेवटी चाहते हाच विचार करत होते: “कमबॅक असा असला पाहिजे भावा!” 😎

शार्दुलचे चक्रीवादळ

आपल्या नवीन खेळाडू शार्दुल ठाकूरने पाच विकेट्स घेऊन मैदानात चक्रीवादळच आणले.  🔥 
त्याने आसामच्या फलंदाजीला भेदताना फक्त तीन ओव्हर्समध्ये ५/२३ अशी कामगिरी केली आणि मुंबईला ९८ धावांनी विजय मिळवून दिला. आणि हो कोण कोण आऊट झाले ते पाहा:

  डॅनिश दास
  सुमित घाडीगावकर
  अब्दुल कुरेशी
  रियान पराग
  निहार डेका

सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे काय माहित्ये का? यातल्या तीन विकेट्स पहिल्याच ओव्हरमध्ये पडल्या. सामन्याचा टोन कसा तयार करायचा हे त्याच्याकडून शिकावे!

तर आजचा दिवस खूप भारी गेला दोस्तांनो: सर्वांच्या काळजाची धडधड वाढवणारा कमबॅक शॉट आणि गोलंदाजीतले एक चक्रीवादळ ज्याने प्रतिस्पर्धी संघाला धूळ चाखवली. चाहते आणि आम्हीही खूप खूश आहोत. 🙌