News

INDvSA, पहिला ओडीआय सामना: रांची रो-कोचा धमाका आणि भारताचा विजय!

By Mumbai Indians

आपली मुलं ओडीआय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करू लागली आहेत. काल तर त्यांनी पार्टीच केली! 😎
नऊ महिने. घरच्या खेळपट्टीवर ओडीआय क्रिकेट पाहण्यासाठी भारताने तब्बल नऊ महिने वाट पाहिली. त्यामुळे उत्साह शिगेला पोहोचला होता. तयारी जोरात झाली होती आणि रांचीमध्ये तर कमालच झाली. 💙
त्यानंतर काय झालं? या रोमांचक सामन्यात लोक उत्साहाने जल्लोष करत होते आणि धमाल करत होते. शेवटच्या ओव्हरपर्यंत हा उत्साह कायम राहिला. आपल्याला हेच तर हवं होतं. 🤌

रो-कोचा शो: रांचीचा ब्लॉकबस्टर मॅटिनी शो 🎥

काही गोष्टी आपल्याला कधीच निराश करत नाहीत. काही गोष्टी वेळ जाते तसे अधिक चांगल्या होतात.
प्रथम फलंदाजीला उतरल्यानंतर भारतीय संघाने अत्यंत उत्साहाने खेळायला सुरूवात केली. हिटमॅन एखाद्या वाघासारखा मैदानात उतरला. त्याने पटापट ५७ धावा करताना अप्रतिम पंचेस आणि पुल शॉट्स मारले आणि विजयाचा पाया रचला.!
📌 रोहित शर्माच्या नावावर आता इतिहासातील ओडीआयमधील सर्वाधिक षट्कार आहेतः ३५२* 🚀
वादळ गर्जत आलं आणि गेल्यावर आली शांत संयमी खेळी. आपल्या विराट कोहलीने १३५ धावा फटकावल्या. अत्यंत संयमी, शांत डोक्याने अजिबात घाई न करता त्याने ही कामगिरी केली. ही कामगिरी पुढील अनेक वर्षं चाहत्यांच्या लक्षात राहील.
पाया भक्कम झाल्यावर राहुल आणि जडेजा आले आणि त्यांनी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं. त्यांनी परफेक्ट फिनिशिंग टचेस देऊन भारताला ३४९/८ धावा करता आल्या.

अर्श+ हर्षितची स्फोटक सुरूवात

भारताची फलंदाजी एक ज्वालामुखी होती तर गोलंदाजी म्हणजे धमाके होते. अर्शदीप आणि हर्षित यांना विजयाची चाहूल लवकरच लागली होती. दक्षिण आफ्रिकेचा संघ काहीच वेळात ११/३ वर पोहोचला.
परंतु प्रोटीआजनी हार मानली नाही. त्यांनी आपला खेळ कायम ठेवला. एकीकडे चौकार, दुसरीकडे दोन धावा. पण भारताने वेळोवेळी विकेट्स कायम ठेवल्या.
जेन्सन- ब्रीत्झकेची भीती- कुलदीप म्हणाला “पुरे आता.”
जेन्सन आणि ब्रीत्झेक यांनी सामना पलटवायचा प्रयत्न केला. एकाने जबरदस्त षट्कार मारले तर दुसऱ्याने कट्स ड्राइव्ह मारले आणि भारताचा प्रत्येक प्लॅन पलटवला.
परिस्थिती गंभीर होऊ लागला तसे कुलदीप यादव खंबीर झाला. त्याने तीन चेंडूंमध्ये दोन विकेट्स घेतल्या. स्थिरावलेले दोन्ही फलंदाज बाद झाले.
वेग? हरवला... भारत? विजयाच्या दिशेने चालू लागला.

शूर बॉश 💪… पण भारताचा विजय 🇮🇳

बॉश लढला. अत्यंत मेहनतीने त्याने हार न मानता अर्धशतक पूर्ण केले.
पण अंतिमतः भारतीय संघ १७ धावांनी जिंकला आणि रांचीमध्ये जल्लोषाचे फटाके फुटले.
थोडक्यात धावसंख्या: भारत ३४९/८ (विराट कोहली १३५, ऑटनिअल बार्तमान २/६०) कडून दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव ३३२/१० (मॅथ्यू ब्रीझ्तेक ७२, कुलदीप यादव ४/६८) .