News

फोटोंमध्ये | सूर्याचा वादा, नुस्ता राडा!!

By Mumbai Indians

आमच्याकडे विशेषणं संपली आहेत. खरंच सांगतो.

या सीझनमध्ये खेळलेल्या प्रत्येक सामन्यात 25+ धावा करणाऱ्या खेळाडूला तुम्ही नक्की काय म्हणाल?
16 इनिंग्स. 717 धावा.
एका सीझनमध्ये 700 धावांचा टप्पा पार करणारा पहिला वहिला मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव ठरलाय. त्याने या दरम्यान सनथ जयसूर्याचा एमआय सीझनमध्ये सर्वाधिक षट्कारांचा विक्रम मोडीत काढला. त्याने आपल्या खास स्टाइलमध्ये ३१ वरून ३८ षट्कार ठोकले. 🌪️

या सीझनमध्ये त्याने फक्त फलंदाजी केली नाही तर कामगिरी केली.

दादाच्या फ्लोमधल्या फोटो फीचरपेक्षा दुसरे जास्त कौतुकास्पद या वेळी काय असू शकते.... १६ सामने, १६ फोटो, स्काय हाय स्टँडर्ड्सच्या १६ गोष्टी. 📸👇

सीएसकेविरूद्ध स्काय- रेस्क्यू एक्टने सुरूवात

एमआय ३६/३ वर पिछाडीवर असताना दादाने २९(२६) धावा काढत पाय रोवला. सीझनची स्वप्नातीत शांत, कॅल्क्युलेटेड सुरुवात.

*****

जीटीविरूद्ध स्काय- फुल ऑन हल्लाबोल 🥊

सुरुवातीला विकेट पडल्यानंतर सूर्याने तिलकसोबत ६२ धावांची भागीदारी केली. त्याच्या ४८ (२८) धावा म्हणजे उत्तम प्लेसमेंट आणि दबावाखाली फटकेबाजी करणे.

*****

केकेआरविरूद्ध स्काय- नऊ चेंडूंमध्ये धुडगूस

तो चौथ्या क्रमांकावर आला आणि स्वतःला पूर्णपणे मोकळे सोडून दिले. ३०० च्या स्ट्राइक रेटने ९ चेंडूंमध्ये २७ धावा! बॅटऐवजी दांडपट्टा तर घेऊन गेला नव्हता ना रे दादा?

*****

एलएसजीविरूद्ध स्काय- स्काय दादा फुल फॉर्ममध्ये 🔥

अत्यंत सुंदर कामगिरीत ४३ चेंडूंमध्ये ६७ धावा- संतुलित आक्रमकता, स्मार्ट प्लेसमेंट आणि स्कायची ती खास स्टाइल.

*****

आरसीबीविरूद्ध स्काय- मि. विश्वासार्ह 💼

२२२ धावांचा पाठलाग? घाबरू नका. सूर्या अत्यंत कठीण परिस्थितीत खेळायला आला आणि त्याने २८ (२६) धावा करून धावफलक पळता ठेवला.

*****

डीसीविरूद्ध स्काय- स्मूथ ऑपरेटर 😎

हा सामना मस्त होता. शांत. क्लिनिकल . त्याने ४० (२८) अशी कामगिरी करताना अप्रतिम फ्लिक्स लेट कट्स मारले. ही अशी कामगिरी म्हणजे डोळ्यांना मेजवानी असते.

*****

एसआरएचविरूद्ध स्काय वेग कायम ठेवला 🔄

फक्त १५ चेंडूंमध्ये २६ धावा. दादाने खेळ पालटताना अत्यंत आक्रमक कामगिरी केली आणि एकामागून एक चेंडू सीमापार पाठवले. त्यामुळे सामन्याचा मूडच बदलला.

*****

सीएसकेविरूद्ध स्काय- विंटेज टच, मॅच विनर

त्याने ३०* चेंडूत ६८ धावांची जबरदस्त कामगिरी - सूर्याने कलाकार आणि फिनिशर दोघांचीही भूमिका साकारली. कोणताही गोंधळ नाही, नाटक नाही, फक्त क्लासिक स्काय स्टाइल.

*****

एसआरएचविरूद्ध स्काय- शांतपणे पाठलाग, क्लीन फिनिश 💫

आणखी एक पाठलाग. आणखी एक संयमी खेळी. १९ चेंडूंमध्ये ४० धावा. अचूक, टोकदार आणि परफेक्ट कामगिरी.

*****

एलएसजीविरूद्ध स्काय- बच्चा पार्टीचा फेव्हरेट दादा 🧒

वानखेडे येथील ईएसए डे हा संपूर्ण स्काय स्पेशलमध्ये बदलला. आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करणारा ५४(२८) चा कार्यक्रम.

*****

आरआरविरूद्ध स्काय- क्लोजर 🧨

डेथ ओव्हर्समध्ये २३* चेंडूत ४८ धावा. एमआयला जलद धावांची आवश्यकता होती, तेव्हा दादाने थंड डोक्याने फिनिशर म्हणून काम केले.

*****

जीटीविरूद्ध स्काय- आपला सूर कायम ठेवला 🎵

त्याच्या ३५ (२४) कामगिरीने खेळ योग्य मार्गावर ठेवला. सूर्या या हंगामात एक उत्तम खेळाडू होता - कधीही ऑफबीट नव्हता, नेहमीच प्रवाहात होता.

 *****

डीसीविरूद्ध स्काय- सर्वोत्तम कामगिरी 🚀

४३ चेंडूंमध्ये ७३ धावा. स्कूप्स, रॅम्प्स, ड्राइव्ह्ज- सूर्याने कॅनव्हासवर सुंदर चित्र काढावे तशा धावा केल्या. अत्यंत सुंदर कलाकृती.

*****

पीबीकेएसविरूद्ध स्काय- विंटेज स्काय 🎯

५७(३९) – अत्यंत उत्तम टायमिंग, त्याच्या सिग्नेचर फ्लिक्स आणि शांत संयमी अस्तित्व. क्लास कायमस्वरूपी असतो याची एक आठवण.

*****

जीटीविरूद्ध स्काय (एलिमिनेटर) – तणावाखाली क्लास कामगिरी 💪

इथे खूप काही पणाला होते. पण दादा कूल होता. त्याने ३३ (२०) अशी कामगिरी करून एमआयला मार्गावर ठेवले. शांत, आत्मविश्वासपूर्ण कामगिरी.

*****

पीबीकेएसविरूद्ध स्काय (क्वालिफायर २)- फायनल खेळ

त्याचा सीझन जसा सुरू झाला तसाच संपला. भरपूर धावा करून. त्याने क्वालिफायर २ मध्ये ४४(२६) धावा करून ही स्पर्धा कायम स्मरणात राहील याची सोय केली.

*****

स्कायच्या इतिहासातील सुवर्णकाळ 🏏

पहिल्या लीग सामन्यापासून ते अंतिम प्लेऑफ सामन्यापर्यंत, सूर्यकुमार यादवने कधीही एकही ताल चुकवला नाही.

त्याने एकेरीत फटके मारले, षटकार मारले. गरज होती तेव्हा तो धावून आला.

त्याची लय कायम होती, त्याचा फॉर्म देखणा होता आणि रेकॉर्ड बुक? या वेळी त्याने पुन्हा एकदा आपले नाव तिथे कोरले.

हा फक्त एक सीझन नव्हता – ते एक स्टेटमेंट होते.

एक दादा. एक मिशन. एक अविस्मरणीय आयपीएल प्रवास. 💙