News

आपला आरटीएमः सीझनचा न-मॅन

By Mumbai Indians

दूध मागाल तर खीर देऊ, ऑल राऊंडर मागाल तर धीर देऊ!

आयपीएलच्या प्रत्येक लिलावात काही ना काहीतरी आश्चर्यजनक घडत असते. पण काही गोष्टी तर जितक्या जुन्हा होतात तितक्या आठवत राहतात. #TATAIPL2025 मध्ये मुंबई इंडियन्सने नमन धीरला राइट टू मॅच कार्डचा वापर करून आपल्याकडे थांबवून घेतले आणि हा आपला सर्वोत्तम निर्णय ठरला. 💙

आपल्या सुपरस्टार्सच्या टीममध्ये धीरचे नाव नमन वीर असावे का असा प्रश्न पडला असे तो खेळला. अत्यंत गरज असताना उत्तम कामगिरी करून संकटातून टीमला बाहेर काढण्याची कला त्याने साधली आहे. त्याने इनिंग्समध्ये स्थैर्य आणले, फिनिशिंग टच दिला आणि अत्यंत उत्तम फील्डिंगही केली. एमआयचा तो लाडका ठरला नसता तरच नवल.

हानिकारक धीर मोड: एक्टिव्हेटेड! 🔥

तो फक्त एक फिनिशर नव्हता. तोच एक फिनिशर होता.

या सीझनमध्ये एमआयसाठी डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावाः १९०
एमआयसाठी त्या टप्प्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्ट्राइक रेट: १९६
तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकून घेतले ना सारे🧨

त्याचे काही अविस्मरणीय खेळ आपण पाहूया:

  • डीसीविरूद्ध ८ चेंडूंमध्ये २४ धावा– तो उशिराने उगवला पण सामना पालटला
  • पीबीकेएसविरूद्ध १२ चेंडूंममध्ये २०– अत्यंत अटीतटीच्या सामन्यात मोजूनमापून आक्रमकता
  • एलएसजीविरूद्ध ११ चेंडूंमध्ये २५ धावा– अख्ख्या इनिंगमध्ये फक्त नमनच्याच नावाची चलती होती!

यातली प्रत्येक इनिंग फक्त कागदावरची आकडेवारी नव्हती. त्यांनी सामने पालटले, खेळाडूंचे मनोबल उंचावले आणि अक्षरशः एक छोटा मास्टरक्लास दिला. तणाव असेल तेव्हा डोके शांत कसे ठेवायचे हे इथे शिकावे.

फील्डमध्येही न-मन! 👏

फलंदाजी ✅
स्ट्राइक रेट ✅
अजून काय हवे? मैदानात अत्यंत सुरक्षित हात- १६ सामन्यांमध्ये १२ कॅचेस. या सीझनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक (विकेट कीपर सोडून) कॅचेस. तो मिड विकेटवर असेल किंवा लाँग ऑफवर असेल. त्याच्या हाताला चुंबक लावल्यासारखे चेंडू येऊन चिकटत होते.

तो फक्त XI मध्ये खेळला नाही तर — महत्त्वाच्या ठरलेल्या प्रत्येक एमआय क्षणाचा तो भाग होता.

नमन ला, मान ला रे! 💙

मैदानात काही खेळाडू  आपली मेहनत आणि चिकाटी यांच्यामुळे मोठे होतात. नमन धीरने आपल्यावर दाखवलेला विश्वास तर सार्थ ठरवलाच पण आरटीएम फक्त एक धोरण नव्हते तर एमआयचा मास्टरस्ट्रोक होता हे त्याने सिद्ध केले.

फिनिशर. जबरदस्त फील्डर. ताण कमी करणारा.
ऑलराऊंडर मागितला तर धीर देऊ.

आरटीएमचा निर्णय बरोबर होता ना? अर्थातच.