News

भारत विरूद्ध इंग्लंड, पाचवा सामनाः जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखालील पाहुणा संघ एजबस्टनमध्ये ऐतिहासिक विजयासाठी

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट संघ येत्या शुक्रवार १ जुलै रोजी बर्मिंगहम येथील एजबस्टन क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंडविरूद्ध पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळणार आहे.

भारत या पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर असल्यामुळे आता पाहुण्या संघाला २००७ पासून ब्रिटीश भूमीवर आपला पहिला कसोटी मालिका विजय मिळवण्यासाठी किमान सामना बरोबरीत सोडवण्याची आशा असेल.

ही वेळापत्रक बदललेली मालिका भारताच्या मागील वर्षीच्या इंग्लंड दौऱ्याचा भाग आहे. ती भारतीय संघात कोविड १९ च्या रूग्णांची संख्या वाढल्यामुळे रद्द करण्यात आली होती. पाचव्या सामन्यात पाहुणा संघ २-१ ने आघाडीवर होता. हा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर होणार होता.

मागील वर्षी इंग्लंड आणि भारताने नॉटिंगहम येथील ट्रेंट ब्रिजवरील पहिल्या कसोटी सामन्यात बरोबरी केली आणि त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील पाहुण्या संघाने जगप्रसिद्ध लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर दुसऱ्या कसोटी मालिकेत १५१ धावांचा दणदणीत विजय प्राप्त केला. त्यामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

परंतु जो रूटचा इंग्लंडचा संघ तिसऱ्या सामन्यात उसळी मारून परतला आणि त्याने भारताला लीड्समधील हेडींग्लेमध्ये ७६ धावा आणि एका इनिंगने हार मानण्यास भाग पाडले. त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत आली.

लंडनमधील केनिंगटन ओव्हलमध्ये आयोजित चौथ्या कसोटी सामन्यात कोहलीच्या संघाने आपली उत्तम कामगिरी केली. त्यांनी इंग्लंडला १५७ धावांनी हरवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

नव्याने वेळापत्रक आखलेल्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला नवीन कर्णधार रोहित शर्माला खेळवता येणार नाही. तो गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा कोविड पॉझिटीव्ह आढळल्याने त्याला बाजूला ठेवण्यात आले आहे.

रोहितच्या अनुपस्थितीत बीसीसीआयने जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा एजबस्टन कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करेल अशी घोषणा केली आहे. बुमरा हा भारताचा ३६ वा कसोटी कर्णधार आणि महान खेळाडू कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केल्यानंतरचा पहिला जलदगती गोलंदाज ठरेल.

आगामी कसोटीसाठी विकेट कीपर फलंदाज ऋषभ पंतच्या नावाची घोषणा उपकर्णधार म्हणून केली गेली आहे.

त्याचवेळी इंग्लंडचा नवीन कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या एजबस्टन कसोटीत खेळणाऱ्या ११ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे.

महान जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरूद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाजूला राहिल्यानंतर खेळणाऱ्या ११ च्या संघात आला आहे. अँडरसन जलदगती गोलंदाज जेमी ओव्हरटनची जागा घेईल.

विकेट कीपर फलंदाज सॅम बिलिंग्स यानेही नियमित बेन फोक्सला पाठीच्या दुखापतीपासून आणि कोविड-१९ च्या संसर्गातून बरे न झाल्यामुळे त्याची जागा घेतली आहे.

यजमान इंग्लंडच्या संघ अलीकडेच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) मालिकेत न्यूझीलंडला ३-० ने भुईसपाट केल्यामुळे आत्मविश्वासाने सळसळता असेल.

बुमराच्या नेतृत्वाखालील भारतीय संघला एजबस्टनमधील पाचव्या कसोटी मालिकेत विजय किंवा बरोबरी करावी लागेल, जेणेकरून त्यांना इंग्लंडच्या हातून मालिका काढून घेता येईल. भारताने इंग्लंडमध्ये १९७१, १९८६ आणि २००७ साली कसोटी मालिका जिंकल्या आहेत.

इंग्लंडचा खेळणारा ११ चा संघ: एलेक्स लीस, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेरस्टॉ, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (विकेट कीपर), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच आणि जेम्स अँडरसन.

भारताचा कसोटी संघ: जसप्रीत बुमरा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (उपकर्णधार / विकेट कीपर), के एस भारत (विकेट कीपर), रवींद्र जडेजा, रवीचरण अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद कृष्णा आणि मयंक अग्रवाल.

पाचवा कसोटी सामना बर्मिंगहमच्या एजबस्टन क्रिकेट मैदानात भारतीय वेळेनुसार दुपारी ३.०० वाजता सुरू होईल.