News

पात्रता २ पूर्वावलोकनः मुंबईची बुलेट ट्रेन अहमदाबादला सहाव्या ट्रॉफीसाठी रवाना

By Mumbai Indians

पुन्हा एकदा आठवण करून देतोय की आपण आता दहाव्या वेळी उपांत्य फेरीत खेळतोय. या टप्प्यावर आमचे वर्चस्व आहे असे आम्ही म्हणू शकतो. हो, ब्लू आणि गोल्डमध्ये हे विधान कोरले गेलेय. इतके की आपण उपांत्य फेरीत सलग सात सामने जिंकले आहेत. हा विक्रम २०१७ पर्यंत गेला आहे. आता आपण आठव्या वेळी जिंकूया.

आपण पात्रता २ सामन्यात जात असताना ही आपल्यासाठी एक सकारात्मक बाब आहे. पण हे फार सोपे वाटेल याच्यासाठी आपण स्वतःला नको फसवूया. नाही. त्यापासून फार लांब राहूया. विद्यमान चॅम्पियन्स गुजरात टायटन्स आपल्या बालेकिल्ल्यात आपली वाट पाहत आहेत. पण आपणही काही कमी नाही आहोत. आपण चेन्नईमध्ये अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून अत्यंत उत्साहात येत आहोत आणि आपल्याला जीटीला सीएसकेविरूद्ध झालेल्या पराभवाने बसलेल्या फटक्याचा फायदा घेणे आवश्यक आहे.

ही तुमच्यासाठी एक आकडेवारी आहेः एमआयने आयपीएलच्या इतिहासात लीगच्या टप्प्यांनंतर सामन्यांमध्ये सर्वाधिक विजयाची टक्केवारी (६८ टक्के) आहे. अहमदाबादचा सामनादेखील आम्ही नक्कीच जिंकू शकतो. गुणसंख्येत चौथ्या क्रमांकावर असलेला कोणताही संघ आजपर्यंत कधीही आयपीएल जिंकू शकलेला नाही. आम्ही नक्कीच हे रेकॉर्ड मोडीत काढू. बिलिव्ह. एक सामना जिंकला. दोन बाकी आहेत. शांत राहा, फार पुढचा विचार करू नका आणि एमआयसोबत राहा.

काय: गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स

कधी: शुक्रवार दिनांक २६ मे २०२३

कुठे: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

काय अपेक्षा आहे: १,३२,००० उत्साहाने सळसळते क्रिकेट चाहते जे वातावरण भारून टाकतील. एक चांगली खेळपट्टी, षटकार ठोकण्यासाठी योग्य ठिकाण आणि दोन्ही संघांमध्ये षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंचा ओव्हरडोस जिथे स्काय संपूर्ण स्टेडियमला निळ्या आणि सोनेरी रंगात रंगवून टाकेल. ओह, आणि रोहित शर्मा १४ सामन्यांमध्ये ११ आयपीएल विजयांचा आपला विक्रम पुढे नेईल.

तुम्ही काय करायचे आहे: तुमच्या मुंबई... , मुंबई...!! जयघोषांचा सराव करा आणि आपण, पलटन नरेंद्र मोदी स्टेडियमला आपले घर बनवू याची काळजी घ्या. जीटीला वानखेडेवर काय होते ते दाखवून देऊया..

ते काय म्हणतात: “मागील काही वर्षांत मुंबई इंडियन्समधून अनेक खेळाडू पुढे येऊन भारतासाठी खेळताना आम्ही पाहिले आहे. त्यांना (तरूणांना) स्पेशल वाटू द्या आणि त्यांना संघाचा भाग आहेत असेही जाणवून द्या. माझे काम त्यांना मधल्या टप्प्यात रूळवण्याचे आहे.” – एलिमिनेटर सामन्यात आकाश मधवालच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रदर्शनाबाबत आपला हिटमॅन- रोहित शर्मा म्हणाला.

आकडेवारी:

संघ

खेळलेले सामने (एकूण)

जिंकले

हरले

बरोबरीत

अनिर्णित

एमआय

3

2

1

0

0

जीटी

3

1

2

0

0

संघ

एमआय जीटीच्या सामन्यात सर्वाधिक धावा

एमआय- जीटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स

एमआय

सूर्यकुमार यादवः ३ सामन्यांमध्ये १३९ धावा

पियूष चावला : २ सामन्यांमध्ये ४ विकेट्स

जीटी

शुभमन गिलः ३ सामन्यांमध्ये ११४ धावा

राशीद खान: ३ सामन्यांमध्ये ८ विकेट्स

आम्हाला हे गृहित धरायचे नाहीये पण पुनरूच्चार करतोयः आपण आपल्या खात्यावर आणखी एक ट्रॉफी करण्यापासून फक्त दोन पावले मागे आहोत. पलटन, २८ मे पर्यंत तुमच्या जोरदार पाठबळाची आम्हाला गरज आहे. तुमचे प्रेम, प्रार्थना आणि आणखी एक सामना जिंकण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टीवर बिलिव्ह करता त्या सर्व गोष्टींनी कमेंट बॉक्स भरून टाका.