News

#JustSuryaThings – ट्विटरवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव

By Mumbai Indians

२०२२ चा विश्वचषक सूर्याचा होता, हे नक्की. चेंडू फाइन लेगमध्ये सरळ लोटण्यापासून ते कव्हर्समधून डाऊन लेगवर असलेल्यांना ड्राइव्ह करण्यापर्यंत स्कायने प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा कायमच समाचार घेतला आहे. आपल्या दादाबद्दल ट्विटरवर क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव झालाय. ते पाहा.

या वेळी त्याला आयसीसी मालिकावीराचा पुरस्कार मिळाला नाही. पण त्या बदल्यात त्याने संपूर्ण जगातील लोकांची मने जिंकली आहेत. ऑस्ट्रेलियात मागच्या चार आठवड्यांपासून त्याने धावांची लुटालूट केली आहे. पुढच्या अनेक वर्षांपर्यंत त्याच्या या कौतुकाचा डंका संपूर्ण जगात वाजत राहील. येणाऱ्या पिढ्या त्याच्या या खेळाचे स्मरण ठेवतील.