News

एमआयचा साप्ताहिक प्रवास: विल जॅक्सची यशस्वी कामगिरी, पोलार्डचा धमाका आणि बरेच काही

By Mumbai Indians

वीकेंड चहा, धमाल आणि अर्थातच या आठवड्यात आपल्या एमआय स्टार्सनी काय काय केले हे जाणून घेण्यासाठी असतात. विश्वास ठेवा, मागचे काही दिवस आमच्यासाठी मस्त ब्लॉकबस्टर होते. चला मग उशीर कशाला? चला…

विल जॅक्सची पुरस्कारांची हॅटट्रिक

विल जॅक्सने उत्तम सुरूवात केली आणि तो आता थांबतच नाहीये. त्याने या सीझनमध्ये नऊ सामन्यांमध्ये २७५ धावा करून ओव्हल इन्विन्सिबल्ससाठी सलग तिसरी हंड्रेड ट्रॉफी जिंकली. यातलं हायलाइट काय होतं माहित्ये का? अंतिम सामन्यात त्याने केलेल्या ७२ (४१) धावा. त्यामुळे त्याच्या टीमला विजय मिळाला. त्याने उत्तम तोडफोड बॅटिंग केली! 💥

**********

कॅरेबियनमध्ये पॉलीची ताकद

यानंतर आपला बिग मॅन कायरन पोलार्डने आपल्या घरच्या खेळपट्टीवर विमान फिरवले. त्याने ८ चेंडूंमध्ये ७ षट्कारांसह २९ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या. याला फलंदाजी नाही तर विध्वंस म्हणतात. 🤯 त्याचे प्रतिस्पर्धी फील्डर्स बॉल कुठे गेला हे अजून शोधतायत म्हणे…

**********

पहिल्या #ENGvSA ODI रिकल्टनची चमकदार कामगिरी

इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिका दौरा २०२५ मध्ये रॉकेट रिकल्टनने पहिल्या सामन्यात ३३ चेंडूंमध्ये ३५ धावा फटकावल्या. त्याने तीन सुंदर कॅचही घेतल्या आणि आपल्या टीमला सात विकेट्सनी सहज विजय मिळवून दिला. विश्वासार्ह फलंदाजी आणि ग्लोव्ह्जमध्ये बॉलची सुरक्षित लँडिंग. 🙌 

**********

टी२०आयचा पहिला सामना= एएम गझनफरसाठी अविस्मरणीय दिवस

सध्या सुरू असलेल्या यूएई टी२०आय तिहेरी मालिकेत अफगाणिस्तानसाठी टी२०आयचा पहिला सामना खेळणाऱ्या आपल्या किशोरवयीन खेळाडूसाठी हा अभिमानाचा क्षण होता. या १९ वर्षीय खेळाडूने पाकिस्तानविरूद्ध ११ डॉट चेंडूंसह ०/२४ अशी सुंदर गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला १८ धावांनी विजय मिळवून दिला. तुला खूप शुभेच्छा मित्रा! ✨

**********

अंगद दोन वर्षांचा झाला!

बुमराह ज्युनियर या आठवड्यात दोन वर्षांचा झाला. आपल्या #OneFamily च्या क्यूट मेंबरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 💙

**********

आशिया कप: सूर्या आणि हार्दिक पोहोचले यूएईला

टीम इंडियाचा टी२०आय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या आशिया कप २०२५ साठी युनायटेड अरब एमिरट्सला जात असताना विमानतळावर बॅगा भरून जाताना दिसले. खूप शुभेच्छा चॅम्पियन्स! 🔥

**********

गणपती बाप्पा मोरया

हिटमॅन 𝕩 आशीर्वाद = पवित्र भावना 🙏

**********

जबरदस्त आठवडा. 🤩 मैदानावरच्या नुस्त्या राड्यापासून ते नवीन सुरूवात आणि कौटुंबिक क्षणांपर्यंत आपले कलाकार प्रत्येक ठिकाणी चमकतायत. ओहो!