
शिक्षक दिनाच्या शुभेच्छाः आमच्या प्रिय प्रशिक्षकांचा गौरव
आमच्या सर्व चाहत्यांकडून, संपूर्ण #OneFamily कडून अशा सर्व महान खेळाडूंसाठी जे पडद्यामागे उभे राहिले आणि त्यांनी खूप मोठ्या गोष्टी केल्या- ते आमचे कोचेस आणि सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी हे कौतुक! 🙌
प्रत्येक ट्रॉफी, प्रत्येक पुनरागमन, वानखेडेवरील प्रत्येक रेकॉर्डब्रेक संध्या किंवा त्याहीपुढे कठीण परिस्थितीत कोणीतरी पाठीशी उभे राहते. त्यामुळे आमचा ब्लू अँड गोल्ड संघ तेजस्वीपणे चमकत राहतो.
तुम्ही फक्त "प्रशिक्षक" नाहीत तर त्याहीपेक्षा बरेच काही आहात- तुम्ही मार्गदर्शक, प्रेरक, मित्र आणि कधीकधी असे कठोर शिक्षक देखील आहात जे खेळाडूंना कठीण गृहपाठ (म्हणजेच अतिरिक्त सराव सत्रे 😬) करायला भाग पाडतात.
सुपरस्टार बनण्याची क्षमता असलेले हिरे शोधून त्याला पैलू पाडणे असो किंवा आपल्या अनुभवी चॅम्पियन्सना उत्तम कामगिरीसाठी मार्गदर्शन करणे असो, अगदी पहिल्या दिवसापासून प्रत्येक यशोगाथेवर तुम्ही छाप सोडली आहे.
पाच आयपीएल ट्रॉफी, दोन सीएलटी२० विजय आणि पहिल्याच डब्ल्यूपीएल ट्रॉफीसह दोन डब्ल्यूपीएल ट्रॉफी – यातले काहीही धडे, रणनीती आणि तुम्ही निर्माण केलेल्या विश्वासाशिवाय शक्य झाले नसते. 💪
Every over, every inning, a million lessons - Thank you, cricket! 🏏💙#HappyTeachersDay #MumbaiIndians pic.twitter.com/yF826YmnuS
— Mumbai Indians (@mipaltan) September 5, 2025
थोडक्यात तुम्ही ती अदृश्य शक्ती आहात जी आमच्या इंजिनला सतत चालना देते. तुम्ही आपल्या मुलांना आणि मुलींना फक्त जिंकायचेच नाही तर लढायचे, तणाव असतानाही हसायचे आणि नेहमी दिल से कसे खेळायचे हे शिकवले आहे. 💙
तर आमच्या सर्व गुरूंना अगदी वानखेडे स्टेडियमभरून मोठ्ठे आभार! तुम्ही फक्त एका संघाला प्रशिक्षित केलेले नाही, तर तुम्ही एक पिढी तयार केली आहे. आणि त्यासाठी आम्ही नेहमीच आभारी राहू. 🙏
पुरूषांच्या संघाचे प्रशिक्षक आणि सहकारी
नाव |
पद |
महेला जयवर्धने |
प्रमुख कोच |
कायरन पोलार्ड |
फलंदाजी कोच |
लसिथ मलिंगा |
बॉलिंग कोच |
पारस म्हाम्ब्रे |
बॉलिंग कोच |
कार्ल हॉपकिनसन |
फील्डिंग कोच |
राहुल संघवी |
क्रिकेट संचालक |
धनंजय सीकेएम |
मुख्य अधिकारी – कामगिरी माहिती आणि नावीन्यपूर्णता |
बेन लँगली |
स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिसीन प्रमुख |
पॉल चॅपमन |
स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच |
क्रेग गोवेंडर |
फिजिओथेरपिस्ट |
प्रशांत सी जंगम |
टीम मॅनेजर |
जे अरूण कुमार |
सहाय्यक फलंदाजी कोच |
एल वरूण |
माहिती विश्लेषक |
अमित शाह |
प्रमुख मसाज थेरपिस्ट |
प्रतीक कदम |
सहाय्यक स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच |
अमित दुबे |
सहाय्यक फिजिओथेरपिस्ट |
सोहराब खुस्रूशाही |
मोबिलिटी अँड मूव्हमेंट ट्रेनर |
विनय कुशवाह |
सहाय्यक मसाज थेरपिस्ट |
मयूर सातपुते |
सहाय्यक मसाज थेरपिस्ट |
किनिता पटेल |
टीमचे आहारतज्ञ |
महिला संघाचे प्रशिक्षक आणि सहकारी
झुलन गोस्वामी |
गोलदांजी कोच आणि मार्गदर्शक |
देविका पळशीकर |
फलंदाजी कोच |
निकोल बोल्टन |
फील्डिंग कोच |
स्टेसी ली हर्क्युलस |
स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच |
अमित दुबे |
मुख्य फिजिओथेरपिस्ट |
बेंजामिन हॉपिट |
माहिती विश्लेषक |
किरण मोरे |
महाव्यवस्थापक |
तृप्ती भट्टाचार्य |
टीम मॅनेजर |
सिमोनी शाह |
सहाय्यक फिजिओथेरपिस्ट |
झाही मोरे |
सहाय्यक स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच |
छाया नाईक |
मसाज थेरपिस्ट |
निशा राणी |
मसाज थेरपिस्ट |
विजया तरवळ |
मसाज थेरपिस्ट |
किनिता पटेल |
आहारतज्ञ |