
सामन्याचे पूर्वावलोकन, एमआय विरूद्ध डीसीः सीझन उत्साहात संपवण्यासाठी उत्सुक
आम्ही आमचा टाटा आयपीएल २०२२ चा सीझन दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सुरू केला आणि आमच्या घरच्या खेळपट्टीवर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर २१ मे ला आमचा सीझन त्यांच्याविरूद्ध खेळून संपवणार आहोत.
आमची आकडेवारी अत्यंत अटीतटीचा सामना दर्शवते. आम्ही दिल्लीविरूद्ध आतापर्यंत खेळलेल्या ३१ सामन्यांपैकी १६ जिंकले आहेत आणि त्यांनी १५ सामने जिंकलेत.
मागच्या पाच सामन्यांमध्ये आमच्या विरोधकांचा 3-2 चा रेकॉर्ड आहे.
सीझनच्या पहिल्या सामन्यात डीसीने आमच्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आणि आता ते प्लेऑफच्या शर्यतीत असल्यामुळे हा सामना कठीण असेल.
या खेळाडूंवर लक्ष ठेवा
ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर मिशेल मार्श हा डीसीसाठी उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने सलग दोन अर्धशतकं फटकावली आहेत.
ओपनर डेव्हिड वॉर्नरने टीमला वेगवान सुरूवात दिली. त्याने दीर्घकाळ फलंदाजी करून ४२७ धावा काढल्या. त्यामुळे तो डीसीचा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे.
स्पिनर कुलदीप यादव हा देखील डीसीसाठी उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने या सीझनमध्ये २० विकेट्स घेतल्या आहेत.
आमच्या बाजूला टिम डेव्हिड जेव्हा जेव्हा खेळायला आला तेव्हा त्याने जोरदार फलंदाजी करून गोलंदाजांनना घाम फोडला आहे आणि रमणदीप सिंगने आमच्या मागच्या सामन्यात तीन विकेट्सची अविस्मरणीय ओव्हर टाकलीय.
कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्यासोबतचा ओपनर ईशान किशन यांनी टीमला चांगली सुरूवात करून दिलीय तर जसप्रीत बुमरा, रायली मेरेडिथ आणि डॅनियल सॅम्स यांनी तडाखेबाज गोलंदाजी केलीय.
आगामी टप्पे
कर्णधार रो टी२० क्रिकेटमध्ये ९०० चौकारांपासून फक्त एक चौकार दूर आहे. त्याला आमच्यासाठी ५००० धावा पूर्ण करण्यासाठी आणखी फक्त २० धावांची गरज आहे.
या सीझनमध्ये पायाला भिंगरी लावलेल्या बूमने हीच कामगिरी कायम ठेवली तर त्याच्या १५० विकेट्स पूर्ण होऊ शकतात.
हा या सीझनचा आमचा शेवटचा सामना आहे. चला मग पलटन, जोराने उत्साह वाढवूया. हा सामना आपल्यासाठी अविस्मरणीय करूया आणि सीझनला अलविदा करूया!