News

दोन भाऊ, दोघे लाडके – टीव्ही, हिटमॅन टी२० आणि ओडीआय रँकिंग्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर

By Mumbai Indians

पलटन, आपला वीकेंडचा मूड एकदम मस्त करूया कारण बातमीच तशी एक नंबर आहे! 🤩

आपल्या नवीन आयसीसी मेन्स रँकिंगने #OneFamily त आनंदाची लाट आणली आहे कारण तिलक वर्मा आणि रोहित शर्मा यांनी अनुक्रमे टी२०आय आणि ओडीआय रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीय.

या वर्षाच्या सुरूवातीला भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या मोहिमेत रोने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पाच सामन्यांमध्ये १८० धावा केल्या. 🙌

आपल्या ओडीआय कर्णधाराने तूफानी खेळ करत सामन्याचा नूर कायम ठेवला. त्याने चेंडूला अगदी योग्य वेळी टोलवले आणि फलंदाजी अत्यंत सोपी करून दाखवली. आपल्या हिटमॅनला खेळताना पाहणे म्हणजे एक मेजवानीच होती. त्याचे दुसऱ्या क्रमांकावर येणे हे मोठ्या सामन्यांच्या टेंपरामेंटचा मास्टरक्लास आहे.

तिलक वर्माने - आमच्या झुंजार योद्ध्याने क्रिकेटमध्ये सातत्याने नाव कमावले आहे. आता क्रमांक २ वर पोहोचणे ही काही छोटी कामगिरी नाही आणि ही फक्त सुरुवात आहे. 💪

आशिया कप २०२५ आणि टी२० विश्वचषक २०२६ जवळ येत असल्याने, तिलक जागतिक व्यासपीठावर ते गाजवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. आपला टीव्ही टीआरपीला छप्पर फाड के नेण्यासाठी तयार आहे आणि आम्हीही तयार आहोत! 🔥

अभिनंदन, भावांनो! 💙 आगामी वर्षांमध्ये तुमच्या यशाची कमान सतत उंचावत राहो याच आमच्या शुभेच्छा.