News

चला गणित सोडवूया: एमआय कोणकोणत्या प्रकारे प्लेऑफ्समध्ये जाऊ शकते

By Mumbai Indians

आयपीएल 2023 चा हा पेनल्टीटाइम आठवडा आहे आणि आपण लीग टप्पा पार करून प्ले ऑफ्समध्ये जाण्याच्या फक्त एक पाऊल मागे आहोत.

पुढच्या काही दिवसांमध्ये सामने कशा प्रकारे होतील त्यानुसार अनेक अंदाज बांधले जात आहेत. आपण येत्या रविवारी (21 मे) आपल्या वानखेडे मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहोत. आयपीएलच्या इतिहासात 10 व्या वेळी आपण प्लेऑफ्समध्ये कोणकोणत्या परिस्थितीत जाऊ शकतो हे आपण पाहूया.

परिस्थिती 1: एमआयने सनरायझर्सला हरवले तर

सध्या आपण 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहोत आणि एका विजयाने गुणसंख्या 16 होईल. याचाच अर्थ असा की इतर सामन्यांच्या परिणामावर प्लेऑफ्समधली जागा अवलंबून असेल आणि एनआरआरवरसुद्धा. मागील काळात आयपीएलमध्ये अनेकदा संघांसाठी हा महत्वाचा ठरला आहे.

एमआयला दुसऱ्या स्थानासाठी पात्र होऊन जागा मिळवण्यासाठी

पात्रता 1:

डीसीला केकेआरविरुद्ध जिंकावे लागेल

केकेआरला एलएसजीविरुद्ध जिंकावे लागेल

आरसीबी आणि पीबीकेएसला उरलेल्या दोन सामन्यांपैकी फक्त एक जिंकावा लागेल.

एमआयला तिसऱ्या/ चौथ्या स्थानावर पात्र ठरण्यासाठी:

सीएसकेला डीसीविरुद्ध जिंकावे लागेल

केकेआरला एलएसजीवर जिंकावे लागेल

आरसीबी आणि पीबीकेएसला उर्वरित दोनपैकी फक्त एक सामना जिंकावा लागेल.

आरसीबी आणि पीबीकेएस यांनी दोन्ही सामने जिंकले, सीएसके आणि एलएसजी यांनी शेवटचे सामने जिंकले तर सगळं विषय एनआरआरवर ठरेल. आणि आपल्याला विषय तिथे जायला नकोय कारण आपला एनआरआर अजूनही निगेटिव्ह आहे.

परिस्थिती 2: एमआयने एसआरएचला हरवले नाही तर

आपण हैदराबादविरुद्ध हरलो तर आपली पात्र होण्याची शक्यता खूप कमी होईल पण पूर्णच जाईल असे नाही. हे सर्व खालील घटनांवर अवलंबून असेल.

एमआयला चौथ्या स्थानावर जाण्यासाठी:

आरसीबीला एसआरएच आणि जीटीविरुद्ध दोन्ही सामने हरावे लागतील. डीसीला पीबीकेएसविरुद्ध जिंकावे लागेल. पीबीकेएस डीसीविरुद्ध हरली तरी त्यांना आरआरविरुध्द जिंकावे लागेल.

यामुळे आपण आणि पंजाबची गुणसंख्या समान होईल पण आपला एनआरआर त्यांच्यापेक्षा खूप चांगला आहे. त्यामुळे आपण पार पडू.

परंतु आरसीबीने दोन्ही सामने जिंकले आणि आरआरने शेवटचा सामना जिंकला तर ते संघ पुढे जातील. पण इतका दूरचा विचार नको करूया. आपल्याला एक मोठा फायदा म्हणजे आपण शेवटच्या दिवशी खेळतो आहोत. सर्व संघांचे सर्व सामने संपलेले असल्याने नेमकी काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहीत असेल. शिवाय आपल्याला वानखेडेवर, माहितीतल्या वातावरणात आणि संपूर्ण शहर मुलांच्या पाठीशी असताना खेळायचे आहे. आणि आपण हे सगळे होत असताना श्रद्धा तर ठेवूच शकतो.