News

INDvUSA निकाल: वानखेडेवर सूर्या दादा इश्टाइलमध्ये जबरा कमबॅक!!

By Mumbai Indians

वाटेत थोडे अडथळे आले पण भारताचे मिशन टी२० विश्वचषक २०२६ वानखेडेवर विजयाने सुरू झाले. 🥳 

भारतीय संघाच्या सुरूवातीच्या फळीने प्रथम फलंदाजी करताना टीम यूएसएच्या स्विंग आणि सीमसमोर लवकर नांगी टाकली. त्यानंतर कर्णधार स्काय अगदी मैं हूं ना, अशा स्टाइलमध्ये मैदानात उतरला आणि त्याने ४९ चेंडूंमध्ये ८४ धावा फटकावल्या. आधी त्याने तणाव कमी केला आणि नंतर भारताला ७७/६ या भीतीदायक स्थितीतून १६१/९ या विजयी टप्प्यावर आणून ठेवले. 💪

धावसंख्येचा बचाव करण्याची वेळ आली तेव्हा आपले जलदगती गोलंदाज मोहम्मद सिजार आणि अर्शदीप सिंग यांनी पॉवर प्लेमध्ये पाहुण्या संघाच्या फलंदाजांची फळी बाद केली. यूएसएचा संघ ७८ धावांमध्ये गुंडाळला गेला.

टी२० विश्वचषक २०२६ चे आपल्या समोरील पहिले आव्हान आपण दूर केले.

कठीण सुरूवात

पहिल्या क्रमांकाचा टी२०आय फलंदाज अभिषेक शर्मा आणि ईशान किशन सलामीसाठी मैदानात उतरले तेव्हा मुंबईचे लाडके आणि जागतिक चाहते इनिंगची धमाकेदार सुरूवात होईल म्हणून आशा लावून बसले होते. परंतु शेडली वान श्कालक्विक (तीन विकेट्स) आणि अली खान (एक विकेट) यांनी अमेरिकन टीमला सामन्यात लवकर यश मिळवून दिले.

सुपला स्टारचा कमबॅक

कर्णधार सूर्या मैदानात उतरला तेव्हा लोकांच्या मनातले वादळ कमी झाले आणि मैदानात वादळ अवतरले. चाहत्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि मि. ३६० ने गियर बदलला. स्कायने ३६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये गाडी थेट पाचव्या गियरवर सुसाट टाकली.

त्याने शेवटच्या १३ चेंडूंमध्ये ३४ धावा फटकावल्या. त्यातल्या २१ धावा सौरभ नेत्रावळकरच्या विसाव्या ओव्हरमध्ये पडल्या.

१९.१ ओव्हर : ४

१९.२ ओव्हर: ६

१९.३ ओव्हर: ६

१९.४ ओव्हर: ४

१९.५ ओव्हर: १

१९.६ ओव्हर: विकेट (धावबाद)

सूर्यकुमार यादवने आपली ही जबरदस्त इनिंग पूर्ण करताना आपल्या नावावर विक्रम नोंदवले.

८३: टी२०विश्वचषक कर्णधार पदाच्या पहिल्याच सामन्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या

१७: भारतासाठी टी२०आयमध्ये सर्वाधिक सामनापटू पुरस्कार

१: पहिल्या टी२० विश्वचषकात अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

भारताने यूएसएसमोर १६२ धावांचे लक्ष्य ठेवले. गरज होती तेव्हा आपल्या दादाने मैदानात तोडफोड बॅटिंग करून हा पल्ला गाठायला मदत केली.

सिराज, अर्शदीपचा लढा 💥🏏

पिचवर दंव पडायला सुरूवात होईपर्यंत भारतीय गोलंदाजांमधला उत्साह शिगेला पोहोचला होता. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्या दुहेरी हल्ल्यासमोर यूएसएचा संघ १६२ धावांच्या पाठलागात टिकाव धरू शकला नाही.

मधल्या फळीत फाइट बॅक? स्पिनर्स होते ना

अक्षर पटेल (२/२४) आणि वरूण चक्रवर्ती (१/२४) यांनी आपल्या स्पिन गोलंदाजीची शक्ती दाखवताना यूएसएच्या प्रतिहल्ला करण्याच्या धैर्याला मात दिली. या दोघांनी चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी ५८ आणि २७ धावांची भागीदारी फोडली. त्यामुळे सामना आपल्या बाजूने पलटला.

अंतिम सीन आणि भारताचा विजय

शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये अमेरिकेला ५८ धावांची गरज होती. परंतु भारतीय संघाने ‘आमच्या’ बालेकिल्ल्यावर म्हणजे वानखेडेवर १६१ धावांचा बचाव करताना डाव ताब्यात घेतला. आता गुरूवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरूद्ध आगामी सामन्यासाठी आम्ही आराम करून तयारी करणार आहोत.

थोडक्यात धावसंख्या: भारताकडून १६१/९ (सूर्यकुमार यादव ८४*; शॅडली वान स्काल्कविक ४/२५) यूएसएचा २९ धावांनी पराभव १३२/८ (शुभम रांजणे ३७; मोहम्मद सिराज ३/२९).