News

बोलीयुद्धः आयपीएल लिलावात एमआय- भाग २ (२०१३-२०१७)

By Mumbai Indians

पोंडुलकर ते पंड्या बंधूंपर्यंत, प्रतिस्पर्ध्यांना बूssssम करून माती चारण्यापासून ते प्रचंड विजयापर्यंत, २०१३-२०१७ हा कालावधी मैदानावर संपूर्ण वर्चस्व गाजवण्याचा होता. या सर्वाची सुरूवात लिलावातच झाली होती. ते दिवस कसे होते हे आपण थोडक्यात पाहूया...

३ फेब्रुवारी २०१३ | चेन्नई: पंटरची मुंबईला साथ

सगळ्यात महत्त्वाचेः आम्ही पहिला चषक जिंकण्यापूर्वीची एक महत्त्वाची गोष्ट! शिवाय जगभरातील अब्जावधी क्रिकेट चाहत्यांची इच्छा पूर्ण करत पोंडुलकरचे स्वप्न सत्यात उतरले. महान खेळाडू रिकी पॉन्टिंग आपल्याकडे कर्णधार म्हणून आला.

या लिलावात धमाकेदार ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आपली सर्वांत मोठी खरेदी ठरला! या २४ वर्षीय खेळाडूला प्रचंड मागणी होती. इतकी मागणी की आपण त्याच्यासाठी इच्छुक असलेल्या सनरायझर्स हैदराबादला मागे टाकले आणि तो त्याच संध्याकाळी कोट्याधीश झाला.

खेळाडू

अंतिम किंमत

ग्लेन मॅक्सवेल 

१,०००,००० यूएसडी

नाथन कोल्टर नाइल

४५०,००० यूएसडी

रिकी पॉन्टिंग 

४००,००० यूएसडी

फिलिप ह्युजेस

१००,००० यूएसडी

जेकब ओरम

५०,००० यूएसडी

१२ आणि १३ फेब्रुवारी २०१४ | बंगळुरू: पुनर्बांधणीला सुरूवात!

तेंडुलकरनंतरचे युग खऱ्या अर्थाने सुरू झाले होते. तत्कालीन ऑरेंज कॅपधारक मायकेल हसीला पहिल्या फळीत अनुभवाची जोड देण्यासाठी खरेदी करण्यात आले. तो २०१४ मधला आपल्या टीमचा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. तसेच तेव्हा इतिहासात सर्वाधिक वेगवान एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक झळकवणाऱ्या कोरे अँडरसननेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हैदराबाद आणि दिल्ली हे त्याला सहजासहजी सोडायला तयार नव्हते. परंतु ४.५ कोटी रूपयांत त्याला खरेदी केले गेले आणि त्याने वानखेडेवर त्या अविस्मरणीय संध्याकाळी राजस्थान रॉयल्सविरूद्ध ४४ चेंडूंमध्ये ९५ धावा फटकावून पैसा वसूल खेळ केला. आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट ठरली. 

आपण या वेळी जसप्रीत बुमरालाही लिलावामार्फत परत आणले. त्याने त्यानंतर आपल्याला बूम बूम एक्स्प्रेसवर स्वार करून १४५ विकेट्स, चार आयपीएल चषक आणि अगणित आठवणींचा खजिना दिला. या वेळी गुरूशिष्य नात्याचाही अनुभव आपल्याला सर्वप्रथम घेता आला कारण आपले विद्यमान क्रिकेट ऑपरेशन्स संचालक झहीर खान दुसऱ्या इनिंगसाठी आपल्यासोबत आले.

खेळाडू

अंतिम किंमत

मायकेल हसी

५ कोटी रूपये

कोरी अँडरसन

४.५० कोटी रूपये

प्रज्ञान ओझा

३.२५ कोटी रूपये

झहीर खान

२.६० कोटी रूपये

आदित्य तरे

१.६० कोटी रूपये

जसप्रीत बुमरा

१.२० कोटी रूपये

जलज सक्सेना

९० लाख रूपये

जोश हेझलवूड

५० लाख रूपये

मर्चंट दे लांगे

३० लाख रूपये

क्रिस्मर संतोकी

३० लाख रूपये

बेन डंक

२० लाख रूपये

सी. एम. गौतम

२० लाख रूपये

अपूर्व वानखेडे

१० लाख रूपये

पवन सुयाल

१० लाख रूपये

सुशांत मराठे

१० लाख रूपये

श्रेयस गोपाळ

१० लाख रूपये

१६ फेब्रुवारी २०१५ | बंगळुरू: कुंग फू पंड्याचे स्वागत

२०१५ च्या छोट्या लिलावाची सुरूवात हार्दिक पंड्याने झाल्यावर तो यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल. २२ वर्षांचा सळसळता तरूण, बुद्धिमान, अननुभवी परंतु विश्वासार्ह. त्याला आपण १० लाख रूपयांमध्ये साइन केले. आणि आपण बघतोच आहोत त्याने काय धमाके केले आहेत ते. धुवांधार चौकार, षटकार, विकेट्स आणि ट्रॉफीज! त्याने त्या वर्षी चेन्नईविरूद्ध जो काही धुमाकूळ घातलाय तो आठवला की अजूनही अंगावर शहारे येतात. पुढील अनेक वर्षे हार्दिक रोहित शर्माच्या सैन्यातला एक महत्त्वाचा सेनापती ठरलाय.

या छोट्या लिलावातील पहिली खरेदी एरॉन फिंचची होती आणि ही बोलीयुद्धाची उत्तमम सुरूवात ठरली. आपण तेव्हाच्या दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत रस्सीखेच केली आणि भरपूर विचार आणि डोके लावल्यानंतर आपण आपल्या प्रसिद्ध ब्लू आणि गोल्डन जर्सीमध्ये फिंचला ३.२० कोटी रूपयांत आणले. त्यानंतर एमआयने तडफदार, उंच आणि रूबाबदार किवी जलदगती गोलंदाज मिशेल मॅक्लेनगन यालाही ३० लाख रूपये किमतीत आणले आणि वानखेडेवर जोरदार स्टंप्स उडवण्याचा आणि आनंदाची पखरण करण्याचा कित्ता पुन्हा गिरवला.

खेळाडू

अंतिम किंमत

प्रज्ञान ओझा

५० लाख रूपये

मिशेच मॅक्लेनगन

३० लाख रूपये

हार्दिक पंड्या

१० लाख रूपये

अक्षय वाखरे

१० लाख रूपये

नितीन राणा

१० लाख रूपये

सिद्धेश लाड

१० लाख रूपये

जे सुचित

१० लाख रूपये

एडेन बिझार्ड

३० लाख रूपये

अभिमन्यू मिथुन

३० लाख रूपये

एरॉन फिंच

३.२० कोटी रूपये

६ फेब्रुवारी २०१६ | बंगळुरू: भाई-भाई, पंड्यांचे बंधूप्रेम

#OneFamily मध्ये बंधूप्रेमाने स्थान मिळवले. २०१६ मध्ये चेंडूला किलोमीटरभर लांब उडवून लावण्याची क्षमता असलेल्या बडोद्याच्या अष्टपैलू खेळाडूने एमआयचे लक्ष वेधून घेतले. हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्याला आपण लिलावात २ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले आणि तो थेट मुंबई मायानगरीत आला. पुढील सहा वर्षांत अनेक गोष्टी बदलल्यात. परंतु एमआयच्या मधल्या फळीत दोन पंड्या आणि पोलार्ड पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर खेळायला सलग जात होते.

२०१६ मध्ये जो बटलरदेखील प्रथमच आयपीएल खेळायला आला. तो तर तेव्हा स्टार कलाकार होता. इथे तो प्रथमच सलामीला उतरला. गोलंदाजीला मोठे खिंडार पाडले आणि या मोठ्या व्यासपीठावर आपल्या आगमनाची दमदार घोषणा केली. २०१७ मध्ये एमआयने चषक जिंकला तेव्हा त्याने केलेला जोरदार डान्स टीव्हीच्या पडद्यावरून घराघरात पोहोचला. तुम्हाला पाहायचा असेल तर तो अजूनही ऑनलाइन उपलब्ध आहे.

खेळाडू

अंतिम किंमत

जो बटलर

३.८० कोटी रूपये

नथू सिंग

३.२० कोटी रूपये

टिम साऊथी

२.५० कोटी रूपये

कृणाल पंड्या

२.०० कोटी रूपये

किशोर प्रमोद कामत

१.४० कोटी रूपये

दीपक पुनिया

१० लाख रूपये

जितेश शर्मा

१० लाख रूपये

२० फेब्रुवारी २०१७ | बंगळुरू: ‘सुपर मिच चे पुनरामगन

मिशेल जो आपल्यासोबत खेळण्यासाठी परत आला. त्याचा भेदक वेग आणि अनुभव यांच्यामुळे २०१७ चा अंतिम फेरीचा काळीज रोखणारा सामना आपल्या हातात आला.

तरूण निकोलस पूरन ज्याला सीनियर क्रिकेटमध्ये फार कुणीच ओळखत नव्हते. त्याने २०१७ मध्ये आयपीएलचे पाणी सर्वप्रथम चाखले. आपल्याकडे थोडक्यात चुकलेला आणि मुंबईकर होऊ न शकलेला आणि इंग्लंडसाठी दोन विश्वचषक जिंकून दिलेला बेन स्टोक्स मुंबईच्या हद्दीतून रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडे १४.५० कोटी रूपयांना गेला. आपण या युद्धा पहिल्यापासून होतो. आपण पहिले बटण दाबले आणि १४.२५ कोटी रूपयांच्या बोलीपर्यंत अगदी जीव लावून लढत होतो.

खेळाडू

अंतिम किंमत

कार्न शर्मा

३.२० कोटी रूपये    

कृष्णप्पा गौतम

२.०० कोटी रूपये 

मिशेल जॉन्सन

२.०० कोटी रूपये 

असेला गुणरत्न

३० लाख रूपये 

सौरभ तिवारी

३० लाख रूपये 

निकोलस पूरन

३० लाख रूपये 

कुलवंत खेजरोलिया

१० लाख रूपये