News

GT vs MI: मुंबई इंडियन्सची गुजरात टायटन्सचा पराभव करून क्वालिफायर २ मध्ये एंट्री

By Mumbai Indians

आयपीएल २०२५ मध्ये आपल्या टीमने एलिमिनेटर सामन्यात शुक्रवारी गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभूत करून विजय नोंदवला. अशा रितीने मुंबई इंडियन्सने क्वालिफायर २ मध्ये जागा मिळवून आपल्या सहाव्या ट्रॉफीच्या दिशेने एक पाऊल टाकले ता एमायचा पुढचा सामना १ जून रोजी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्सविरूद्ध असेल.

महाराजा यादवेंद्र सिंह इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात मुंबी इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमआयने प्रथम फलंदाजी करून २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स देऊन २२८ धावा केल्या.

याला उत्तर देण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सला २० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स देऊन २०८ धावाच करता आल्या आणि आयपीएल २०२५ मधून बाहेर गेली.

रोहित शर्माने शानदार अर्धशतक फटकावले आणि जॉनी बेअरस्टोसोबत उत्तम फलंदाजी करत टीमचा पाया मजबूत केला. सलामी फलंदाजांनी वेगाने धावा केल्या आणि पॉवर प्लेमध्ये एमआयने एकही विकेट न देता ७९ धावा केल्या.

या सीझनमध्ये मुंबईने पॉवर प्लेमध्ये ही सर्वाधिक धावसंख्या केली होती.

पहिल्या विकेटसाठी रोहित आणि बेअरस्टो यांनी ८४ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो आठव्या ओव्हरमध्ये साई किशोरकडून बाद झाला आणि त्याने ४ चौकार व सहा षट्कारांच्या मदतीने २२ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या.

यानंतर रोहितसोबत सूर्यकुमार यादव खेळायला आला आणि त्याने धावा करण्याचा वेग कायम ठेवला. सूर्यकुमारने आक्रमक फलंदाजी करत हिटमॅनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली.

एमआयने १३ व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमारच्या रूपाने दुसरी महत्त्वाची विकेट गमावली. त्याने एक चौकार आणि तीन षट्कारांच्या मदतीने २० चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या.

रोहित शर्माने या वेळी २८ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमारनंतर तिलक वर्मानेही रोहितला चांगलीच साथ दिली. परंतु १७ व्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाने रोहितला बाद केले. रोहितने ५० चेंडूंमध्ये ८१ धावा फटकावल्या. त्याने नऊ चौकार आणि चार षट्कार मारले.

याच इनिंगदरम्यान रोहित आयपीएलच्या इतिहासात ३०० षट्कार फटकावणारा पहिला भारतीय केळाडू ठरला. त्याने या वेळी आयपीएलमध्ये ७००० धावांचा आकडाही पार केला.

तिलक वर्माने ११ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या तर नमन धीरने ९ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने नाबाद खेळताना शेवटच्या ओव्हरमध्ये तीन षट्कारांसोबत ९ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. अशा रितीने मुंबई इंडियन्सने २० ओव्हर्समध्ये पाच विकेट्स देऊन २२९ धावांचे लक्ष्य ठेवले.

गुजरात टायटन्सच्या खेळाची सुरूवात वाईट झाली. गुजरातने पहिल्या ओव्हरमध्येच कर्णधार शुभमन गिलची महत्त्वाची विकेट गमावली. तो फक्त एक धाव काढून बाद झाला.

यानंतर साई सुदर्शन आणि कुसल मेन्डिस यांनी खेळ सावरला आणि महत्त्वाच्या धावा केल्या. मिचेल सँटनरने मुंबईला दुसरा विजय मिळवून देताना मेन्डिसला २० धावांवर बाद केले. त्याने साईसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली.

पण यानंतर सुदर्शनसोबत वॉशिंग्टन सुंदर खेळायला आला आणि त्याने टीमला लक्ष्याजवळ पोहोचायला मदत केली.

जसप्रीत बुमराहने १४ व्या ओव्हरमध्ये ८४ धावांच्या या उत्तम भागीदारीला एका सुंदर यॉर्करने तोडले आणि एमआयला तिसरा विजय मिळवून दिला. वॉशिंग्टनने पाच चौकार आणि तीन षट्कारांच्या मदतीने २४ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या.

लवकरच एमआयला साई सुदर्शनच्या रूपाने मोठे यश मिळाले. रिचर्ड ग्लीसनने १६ व्या ओव्हरमध्ये सुदर्शनला बाद केले. सुदर्शनने सुंदर खेळ करत दहा चौकार आणि एका षट्काराच्या मदतीने ४९ चेंडूंमध्ये ८० धावा केल्या.

टायटन्सकडून शेरफेन रदरफोर्डने १५ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या. शाहरूख खान १३ धावा करून अश्विनी कुमारकडून बाद झाला. राहुल तेवतियाने नाबाद राहून १६ धावा केल्या.

अशा रितीने गुजरात टायटन्सने ठरलेल्या २० ओव्हर्समध्ये २०८ /६ धावा केल्या आणि त्यांना लक्ष्य पूर्ण करता आले नाही. त्यामुळे आयपीएल २०२५ मधला त्यांचा प्रवास थांबला

मुंबईकडून ट्रेंट बोल्टने दोन विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, मिचेल सँटनर आणि अश्विनी कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

थोडक्यात धावसंख्या:

मुंबई इंडियन्सकडून गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव.

मुंबई इंडियन्स: २० ओव्हर्समध्ये २२८/५; रोहित शर्मा ८१ (५०), साई किशोर २/४२

गुजरात टायटन्स: २० ओव्हर्समध्ये २०८/६; साई सुदर्शन ८० (४९), ट्रेंट बोल्ट २/५६