
आयपीएल क्वालिफायर २ | #PBKSvMI ग्राफिकल पूर्वावलोकन: ही एमआयची खासियत आहे. चला मग #PlayLikeMumbai
पलटन, आता वेळ आलीय. मोठ्ठ्या फायनलपूर्वी फक्त एकच सामना शिल्लक आहे! 💥
एलिमिनेटरमध्ये जीटीवर रोमांचक विजय मिळवल्यानंतर आपले बॉईज इन ब्लू अँड गोल्ड पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहेत - यावेळी आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर २ मध्ये पीबीकेएसविरुद्ध ते खेळतील.
हा आणखी एक नॉकआउट सामना आहे. आणखी एक जिंकू किंवा मरू असा सामना आहे आणि ध्येय सोपे आहे: पंजाबला हरवून आरसीबीविरुद्ध अंतिम सामन्यासाठी गोल्डन तिकीट मिळवणे!💪
आपल्या संघाकडे उत्साह आहे. प्रचंड जोश आहे. त्यामुळे आम्ही जाळ अन् धूर संगटच आणण्यासाठी तयार आहोत. 👊 अर्थात हे सोपे नाहीये. परंतु टीम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आणि जीव तोडून खेळण्यासाठी तयार आहे.
या एवढ्या मोठ्या सामन्यासाठी महत्त्वाची आकडेवारी गरजेची आहे. ती आलीय आपल्या डेटा टीमकडून … 💻
PBKS vs MI – एकास एक आकडेवारी
मागच्या वेळी झालेल्या दुर्दैवी पराभवामुळे हे अंतर कमी झाले. परंतु भूतकाळ मागे सोडून स्वतःला पुढे आणण्याची ही वेळ आहे.

**********
नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलमध्ये सरासरी पॉवर प्ले धावसंख्या
२०२५ मध्ये या ठिकाणी खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सरासरी धावसंख्या सर्वाधिक होती.
दोन्ही बाजूकडे उत्तम दर्जाचे फलंदाज आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ एकमेकांना भिडतील तेव्हा अमदावादमधले तापमान चांगलेच तापणार आहे.

**********
पीबीकेएसविरूद्ध २०१८ आणि २०१९ मधले सामने आठवतात का?
काळजी करू नका मित्रांनो. आम्ही आहोत ना! 🤜🤛 थोडक्यात सांगायचे तर परिस्थिती कठीण होते तेव्हा आम्हीही कणखर होतो. म्हणजेच आपल्या आगामी प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध #PlayLikeMumbai असा परफॉर्मन्स पाहायला मिळेल.
• आयपीएल २०१८ | लीग टप्पा | मुंबई | एमआयचा तीन धावांनी विजय

• आयपीएल २०१९| लीग टप्पा | मुंबई | एमआयचा तीन विकेट्सनी विजय

**********
नरेंद्र मोदी स्टेडियम - आयपीएल २०२५ मध्ये बाद करण्याच्या पद्धती
आऊटफिल्डपासून सावध राहा भावांनो… 👀

**********
अजून एक विजय... फक्त एकच आणि आपण आपले स्वप्न पुन्हा एकदा सत्यात उतरवण्यासाठी एक पाऊल जवळ जाणार आहोत! 🤩
पीबीकेएसविरूद्ध स्पर्धेसाठी सगळे तयार आहेत. चला तर मग!