News

“आपल्या शहराचा आणि देशाचा खऱ्या अर्थाने महान खेळाडू”: स्टँडच्या अनावरणाबाबत सौ. नीता एम. अंबानी यांच्याकडून रोहितचे अभिनंदन

By Mumbai Indians

बोरिवलीचा हा पोरगा ज्याच्या नावावर वानखेडेवर आता एक स्टँड झालाय!

रोहित शर्मा, आपला अभिमान, आपला लाडका खेळाडू. त्याने संपूर्ण देशातील प्रत्येक मुलाला स्वप्न पाहायची प्रेरणा दिली आहे. त्याने वयाच्या विसाव्या वर्षी भारतासाठी खेळायला सुरूवात केली. त्यानंतर पुढच्या १८ वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने इंडियन ब्लू रंगात रंगला. त्याने मुंबई इंडियन्ससोबत पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आणि टी२० वर्ल्ड कप व चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारताकडील अनेक वर्षांचा आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवला. त्याची गोष्ट खऱ्या अर्थाने परिकथेसारखी आहे.

१६ मे २०२५ रोजी त्याचा हा गौरव आणखी खास ठरला. रोहितने मुंबई क्रिकेटमधल्या अनेक महान खेळाडूंसोबत अगदी मनसोक्त क्रिकेट ज्या वानखेडे स्टेडियमवर खेळले तिथल्या दिवेचा पॅव्हिलियनवर लेव्हल तीनला रोहित शर्मा स्टँड अशी ओळख मिळाली आहे.

"खूप अभिनंदन रोहित! वानखेडे आपल्या एका लाडक्या खेळाडूचा गौरव करत असताना त्यात फक्त तुझ्या आठवणी नाहीत तर तुझे नावही आहे. प्रत्येक तरूण क्रिकेटपटूसाठी ही एक प्रेरणा आहे. आपले शहर आणि देशाचा खऱ्या अर्थाने महान खेळाडू तू आहेस," असे मत मुंबई इंडियन्स टीमच्या मालक सौ. नीता अंबानी यांनी व्यक्त केले.

आपला रो याच स्टँडमध्ये एक दणदणीत षट्कार कधी मारतो याची आम्ही वाट पाहतोय!